Motivational quotes in Marathi, Positive thoughts in Marathi

Motivational quotes in Marathi , positive thoughts in marathi

परिस्थितीने उद्धव्स्त केले असेल तर
एकच विचार करा कि , आता स्वतहाला
re-develope करायचंय

जो व्यक्ती सहन करत असतो, त्यालाच जगण्यासाठी
काहीतरी सापडत असतं

प्रत्येक समस्या सोडविणे गरजेचं नाही, त्यातले काही स्वीकारून
काही सोडून दिल्याने शांतता मिळते

जे व्हायचंय ते होणारच
त्यावर फुली मारून , मी जे करणार
त्या क्षणाला आलिंगन द्या

Instagram Quotes for instagram

आपल्याला नेहमी वाटत कि इतरांचं
आयुष्य आपल्या पेक्षा बरं चाललंय पण ,
आपण हे विसरतो कि इतरांसाठी आपणही
कुणीतरी इतरच आहोत

अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणारी
व्यक्ती दुसऱ्यांना सुद्धा अडचणीत आणते

एकदा ठरवलं ना कि जगायचंच आहे
कि मग जमतंच

आनंद हा एक प्रवास आहे
अंतिम ठिकाण नव्हे

जे व्हायचंय ते होणार
ह्या वर फुली मारून
मी जे करणार तेच होणार
याला आलिंगन द्या

विनाकारण त्रास देणाऱ्या
व्यक्तींच्या सानिध्यात
गेल्यानंतर मूक आणि बधिर
व्हायचं विसरू नका

प्रचंड महत्वाकांक्षी वृत्ती
सुद्धा आपल्याला चिंताग्रस्त
करून सोडते

समजूतदारपणा खूपच वाढला
असेल तर तो त्रासदायकच ठरतो
समोरच्याला जे ऐकायचे आहे तेच
बोलत बसू नका , बहुतेक वेळा
तुम्हाला जे सांगायचे आहे तेच
समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या

हसता हसता अचानक डोळ्यात रडू येत असेल
तर मनात प्रचंड भावनिक कोंडमारा होतोय
तो कोंडमारा लवकरात लवकर मोकळा व्हायला पाहिजे

आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी
तो पर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही , जोपर्यंत
आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही

लोक तुमच्या बद्दल काय बोलतात या वर
हरकत घेऊ नका , काही लोक दुखी असतात
ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी
काहीतरी बोलत असतात

जो व्यक्ती सहन करत असतो , त्यालाच
जगण्यासाठी काहीतरी सापडत असतं

Marathi captions for instagram

आपली कदर नसलेल्या माणसांसोबत उभे राहण्यापेक्षा
एकट्याने उभे रहा आणि जगून दाखवा

काहींना सांभाळा आणि
काहींपासून सांभाळून राहा

आपण दुखणं घेऊन बसलो कि
दुखणं सुद्धा आपल्याला घेऊन बसतं

बिघडलेल्या मानसिकतेतून बाहेर पडणे
हे एका रात्रीत होणार नाही , हि एक प्रक्रिया आहे

नकारात्मक भावनांना धरून ठेवल्याने तणाव , संताप
आणि विषारी मानसिकता बनत जाते

चूक होणार आहे हा धोका पत्करूनही
पुढे जाण्याची निवड केल्याने
अनपेक्षित संधी उपलब्ध होतात

आपण कशात उत्कृष्ट आहोत
याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे
नाहीतर दिशाहीन प्रवास सुरु होतो

आनंदी जीवन जगण्याचा अर्थ असा नाही कि,
असलेल्या सर्वच अडचणी संपतील

आपले विचार आणि आचरण हे सतत
नव्याचा शोध घेणारे, नम्र , आशावादी आणि प्रवाही
ठेवल्यास नकारात्मकतेवर हमखास मात करता येते

आपण सर्वच एक स्वतंत्र जीव आहोत, त्यामुळे कुठेही जास्त
जीव लावणं हे आपल्या जीवाला न परवडणार असतं

स्वतःला एक ठराविक स्पेस देऊन आपण एक
नवीन द्रुष्टीकोन विकसित करू शकतो

जे लोक खूपच भावनिक असतात
ते तीव्र मूड स्विंग अनुभवू शकतात, एक क्षण
आनंदी वाटतात तर अचानक दुखी किंवा रागावतात

जिवनाबद्दल सकारत्मकता येण्यासाठी
आधी आपण सर्वानी आशावाद जोपासायला हवा

आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे
हे आपल्या व्यक्तिगत विकासासाठी हानिकारक आहे

तुम्हाला विचलित करण्यासाठी आलेल्यांसमोर
इतकं ध्येयवादी होऊन जग कि शेवटी तेच विचलित होतील

आपला अंतआत्मा स्वतःच्याच प्रेमाने तृप्त नसेल
तर , त्यासाठी आपल्याला बाहेर वणवण फिरायचीच वेळ येणार