Simple marathi caption for instagram

मी शेवटची कथा लिहीत नाही
कारण , आयुष्याची सुरुवात मांडायचा
आनंद काही औरच असतो

विझतो कधी हा सवाल तुझा
स्पर्शून अग्नीस आलो तरी ,
मी पुरता खाक नाही

मी पात्र जपून ठेवली
तिने पाठवलेली
खोडून शब्द पत्रातली
भावनेने लपवलेली

Captions for instagram

श्वास सोडून जाताना देहाला पोरकं केलस
पचवून दुःखद खारट अश्रूंना परकं केलस

पुस्तकांना मन कप्प्यातून मुक्त केलंय
जपून त्यांना ठेवणे माझाच गुन्हा होता

तुटायची इच्छा होती पण ,
तुझ्या आसवांनी सैलता दिली अन
तुटण्या आधीच विरघळलो

इच्छेलाही मन मिळावं
तिने सार दुःख गिळावं

अनपेक्षित होते मला
तिचे असे वागणे
ती गालावरची खळी
तिचे अपेक्षित लाजणे

अलगद उचलून घ्यावे
तुझ्या आठवणीतले फुले
कुना ठाऊक उद्या गंधाने
माझ्यावर चोरीचा आरोप केला तर

बेधुंद जगणे राहून जावे
क्षणभर तू नसतांना
सुटलेल्या क्षणाची हीच
तक्रार होती

दूरवर फक्त नि फक्त
अंधार दिसतो
जेव्हा तुझ्या अंगणातला सूर्य
माझ्या शब्दावर रुसतो

सावरतांना बघितलेत कित्येक आसू
हसऱ्या बागेत काटे रुततात तेव्हा

गर्दीत उभे ते कोण ? चेहरे बघायचे राहून गेले
साथ मिळूनही दर्दींची, जगायचे राहून गेले

बंदीस्त जरा मी
अस्तित्वाला शोधतो आहे
आठवून माझ्याच आनंदी क्षणांना
कुरवाळून मोजतो आहे.