marathi caption for Instagram

caption for instagram in marathi

सोबतीला एकांत असला की,
एकटं असण्याचे दुःख होत नाही

तुझ्या आठवणींचा पसारा नको हृदयात
कारण, पुस्तकांचा वावर वाढलाय घरात

तुला हवे ते मिळव तू
उरलेल्या यादीत वस्तूंच्या
माझे स्थान ठरव तू

instagram captions marathi

ओलीचिंब कथा भिजलेली
शब्दांनी आडोशाला ऐकवावी
घेऊन संदर्भ बरसत्या आसवांचा
दोन पान वाचताच संपवावी

नव्याने काय लिहायचे तुझ्यासाठी
बरसणारा पाऊस ,
सारेच सांगून जातोय

खुल्या पुस्तकात माझ्या
शब्दांनीच मांडायचे होते
आसवे सुकलेली पानांनी सोडून
रेषांनीच भांडायचे होते

मी शांतच आहे असं
म्हणायला हरकत नाही
कारण , वादळे उठले तरी
ते माझ्याकडे फिरकत नाही

attitude captions for instagram in marathi

मी पत्रे जपून ठेवली
तिने पाठवलेली
खोडून शब्द पत्रातली
भावनेने लपवलेली

शोधायचे कसे तुला
गर्दीत साऱ्या जुन्याच वेदना

बरं ! त्या गुलाबाचे काय म्हणणें आहे
जो तुला नेहमी प्रमाणे प्रेमाने छळायचा
कधी होता तो काट्यांनी रक्ताळलेला
अन , तुला तोच आवडायचा

मशगुल मी कधीचा
सावरायचे भान नाही
उरलेत हिशेब अडगळीतले
चुकवायचे ध्यान नाही

सारेच दूर गेले
मन एकटे सारे
वाट पाहुनी लाटेची
नयनी वसले किनारे

इच्छेलाही मन मिळावं
तिने सारं दुःख गिळावं

फिकीर नाही आता मला
काटेरी अनवाणी रस्त्याची
कहाणी केव्हाच लिहून ठेवली
शब्दांनी माझ्या सूर्यास्ताची

बेधुंद जगणे राहून जावे
क्षणभर तू नसतांना
सुटलेल्या क्षणाची
हीच तक्रार होती

तुझे बहाणे जुनेच आता
नवा कुठलाच अविष्कार नको
मारून गेले नजरांचे तिर विषारी
दिखाव्यांचा पुन्हा सत्कार नको

तुझ्या जुन्या आठवणी
अगदी आहेत जपून
आजही रागावलो कुणावर तर
शांत होतो लपून त्या बघून

नात्यांना जेव्हा बेभाव विकल्या जातं, स्वार्थाच्या बाजारात
तेव्हा आपुलकीच्या माणसांची किंमत कमी होत जाते

तू पांघरून प्रेमाची सावली मला झोप दे
श्वास नकोच मला फक्त हसून निरोप दे

अनपेक्षित होते मला
असे हातात हात मागणे
ती गालावरची खळी
तिचे अपेक्षित लाजणे

सावरतांना बघितलेत कित्येक आसू
हसऱ्या बागेत काटे रुततात तेव्हा

काही नाती चुरगाळलेल्या
कागदासारखी फेकून दिली जातात

गर्दीत उभे ते कोण ? चेहरे बघायचे राहून गेले
साथ मिळूनही दर्दींची , जगायचे राहून गेले

तुटायची इच्छा होती पण ,
तुझ्या आसवांनी सैलता दिली
अन, तुटण्या अगोदरच विरघळलो

बस्स ! असच सोबत राहायचंय तुझ्या
साखर गोडव्या सोबत कडवटपणा स्वीकारून

मी तुझ्यात गुंतलो की
व्यस्त मन रुसून बसतं

चुरगाळलेल्या तुझ्या नकाराचे पत्र
अजूनही जपून आहे
लिहितो फक्त मुखवट्या मागच्या चेहरा लपवायला
पत्रातला शब्द न शब्द आजही लपून आहे

गोष्ट सांगून चांदोमामाची बाळा
उपाश्या कुशीत निजवितो
अर्ध्या भाकरी सारखा चंद्र गोष्टीतला
सांगून पौर्णिमेचा चंद्र लपवितो

वा रे ! देवा अजब तुझा सिनेमा
तुझ्या दिग्दर्शनात प्रत्येक सिनेमा हिट,
मग शेतकऱ्याच्या उभ्या पिकात कां हि गारपीट

प्रश्न चिन्ह ? नकोत
प्रश्नाचे उत्तर हवे आहे
घाबरू नको
प्रश्न जुनेच माझे
उत्तर नवे हवे आहे 

तत्त्वांशी तडजोड म्हणजे स्वाभिमानाला
परालायसिस गेल्या सारखं असतं

मी शेवटची कथा लिहीत नाही
कारण , आयुष्याची सुरुवात मांडायचा
मजा काही औरच असतो

दूरवर फक्त आणि फक्त
काळोख दिसतो
जेव्हा तुझ्या अंगणातला सूर्य
माझ्या शब्दनवर रुसतो

माझे जगणे कसे हे
मरणसाठी झुरणे कसे हे
सारेच जळून खाक आता तरी
सारणाचे या नखरे कसे हे

अलगद ! उचलून घ्यावे
तुझ्या आठवणीतले फुले
कुना ठाऊक उद्या गंधाने माझ्यावर
चोरीचा आरोप केला तर

मी मुक्त व्हायचे कसे
बंधने गुंतागुंतीचे असतांना
ओघळणारी अश्रूंची लाट
दिसली जेव्हा निखळ हसतांना