Heart touching kavita on life , marathi kavita on life

image credit-pixabay

आयुष्य असतं रबर सारखं

लवचिक अन्

जरा दु:खाने

ताणलेलं रंगबिरंगी स्वप्न

रात्रीच्या काळोखात

जगायला काहीसा आधार देणारे

मी कसे जगायचे क्षणाक्षणाला

अट्टाहासाने विचारते

गुंतागूंत होते घुसमटीचा गठ्ठा

होतो तयार, रद्दी म्हणायची कशी ?

तीला रबर व्यापक नसतो

प्रश्न आणि उत्तरं असतात बाकी

चार दिवसाची धडपड जिंदगीची

कुणीही कधी झाकत नाही..

सोडायचं कां ! मग वेळेवर

भविष्याची रबर कहाणी

गुंफलेली स्वतहात स्वतहा

एकटी कथा एका शेवटासाठी..

सोप्प करुन सांगतो….

असेल वेळ तुझ्याकडे तर
बस जरा माझ्याजवळ
आयुष्याचे गणित आणखी
सोप्प करुन सांगतो
चूकले असतील काही हिशेब
तर काही गुंतागूंतीचे
घाबरु नको मांडून ठेवलेल्या
भावनांची उकल करुन सांगतो
मान्य नाही सवड निवांत बसायला
नवेच इतके आहे कि, जुने आठवायला
तरी जरा वेळ काढून बघ
काल परवा रोज तू दिसतो
धावपळीत, काय शोधतो स्वतहाला
कि, वास्तव जळजळीत
विझवू रे फुंकर घालून विस्तव
जळत‍ा नशीबाचा
जरा वेळ दे सोप्प करुन सांगतो
हो ! होते दमछाक, घामही विरतो
मळतं सकाळी घातलेलं शर्ट संध्याकाळी
कां पळतो बेभान जगण्याचं झालय
मँरेथाँन , आता तरी जरा आराम
निवांत बसू खोट्याचही खरं करुन सांगतो
नाही वाढविणारं तुझा गुंता आणखी
नक्की सोडवेल तुला चक्रव्युहातून
एकदा तरी महाभारत सोडून
जगायला शिक या घुसमटीच्या कचाट्यातून
बरं ! जमेल तसे तू घ्यायचं मी बोलेल ते
बाकी सार काही नको घेवू
फक्त एक कर जरा वेळ काढून भेट
खरच सांगतो सोप्प करुन…

https://x.com/iahs_93/status/638064756801167360?

बैलांचा पोळा जरी

माणसाचा बैल झाला

काल परवा साधा दिसनारा

आज पुरता सैल झाला

राबतो रोजीरोटी साठी

कुणी मन मारुन तर

कुणी गुणाच्या शर्यतीतं

ग्लोबल झाल्या जुनाट

व्याख्या, मात्र नव्या अभ्यासक्रमातचं

माणुसकीच्या चुका खर्‍या

एक दिवस सुट्टीचा मिळतो

मात्र रविवार नावाने भाळतो

पंचपक्वान खाणारा काल

आता रुखसुखही गिळतो

बुध्दी, चार्तुयाने दिसतो खुलून

कोट-टायच्या रुबाबात,

नाती हरवुन बसतात

गैरसमजाच्या दुराव्यात

शोधावं लागतय हरविलेलं

जुनं त्याच अस्तित्व

महिन्याखेरीज फेडाया बसतो

हौस नावाची किस्त

कुटूंबासोबतं घोटभर चहा

पितांना कधी दिसत नाही

हा माणुस कि, जनावर

भेद काही मिटत नाही

धावतो सुसाट फक्त

चैन सुखाच्या मार्गाने

असा कसा वाटलाय माणुस

पैसाच्या या धर्माने

वेचुन वेचुन करावी कां

माणुसकी पुन्हा गोळा

कधी फुटनार कोण जाने

आयुष्याचा पोळा….

image credit-pixabay
हवा असतो एकांत

तुला मला अगदी श्वासालाही

दगड विटांशी गप्पा करायला

निर्जिव म्हणजे काय समजायला

हवा असतो एकांत

उगाच उद्याची बात कश्याला

आजचं गणित सोडवायला

राहून गेलं धडपडीत सुटलेलं

कोडं सोडवायला

हवा असतो एकांत

मी आणि मी फक्त

आजुबाजूला गजबजलेलं नको

स्विकारायला स्वछंदी मनाला

मोकळ्या सोडलेल्या भावनांशी

एकरुप होण्या क्षणांना

हवा असतो एकांत

देणे घेणे उधारीचे हिशेब

हरवून कागदी कलमा

अर्थकारणाचे फसवे डाव

उधळायला हवा असतो एकांत

कचकचून मिठीत घ्यायला

स्वमग्न स्वप्न बघायला

रात्री सोबत दिवसालाही

मनमुराद लुटायला हवा असतो एकांत…

तुला मला अगदी श्वासालाही

हवा असतो एकांत…..

Read More- Marathi instagram captions, facebook status

https://oneclickmaharashtra.com/marathi-instagram-captions-facebook-status/