Happy thoughts in marathi

Happy thoughts in marathi

बघ उद्या डोळ्याने आभाळ फाटलेलं दिसेल
जगायचे विसरु नको इतक्यात,उभं पिक हसतांना दिसेल.

कौलारु घरातली माणसं स्वभावाने सुध्दा कौलांन सारखी असतात.. आयुष्यभर एकमेकांना सांभाळून हातात हात घट्ट पकडून उन्ह पाऊस वारा सारख्या सुख दु:खाशी सामना करतात.. सुगीचा दिवस तर नशिबानेच मिळावा. टप्पोरे थेंब बर्‍याचदा कौलांना फोडून काढतात.. ओसरता पाऊस सुध्दा जिर्णत्वाचा आरंभ करुन जातो. मग उरतो उन्हाळा तहानलेल्या उन्हाशी एक दोन हात करतांना होणारी दमछाक जिर्ण झालेल्यांमध्ये कुठून येते देव जाणे.. उष्णतेचा पारा व पाऊस गारा सोसतांना कौलांसारखी माणसं दिसली कि, ठिसूळता या शब्दाचा समानार्थी शब्द सुध्दा गवसतं नाही.

Happy thoughts image credit-pixabay

Happy thoughts in marathi

शोधत असतो रोज
सकार‍ात्मक उर्जेचे व्यक्तिमत्व
जरा माझ‍ाही स्वार्थ दडलेला
मल‍ा मिळवायची असते उमेद
तुझ्यातल्य‍ा प्रयत्नातून
तू दिलेल्या प्रत्येक जिद्द पेरणार्‍य‍ा
बिजाची किंमत बघायची असते
तू आहेस अनमोल हेही जाणीव
असत‍ांन‍ा,
तू विरुध्द प्रवाह‍ाच्या किंवा प्रवाह
तूझ्य‍ा विरुध्द हे तू कधीच डोक्यात घेतलं नाहीस,
कारणही अगदी स्वच्छ
तूझ्य‍ातल्य‍‍ा प्राम‍ाणिक इच्छाशक्तीचे,
तू जसा ‍आहेस तसाच रहा
खुप, प्रचंड उर्जा आहे तुझ्यात
ती समाजाकरिता शून्या सारखीच
कारण, सुरुवात झालीय त्या शून्या भेदण्याची
माणसाला माणुसकीने जगविण्याची…

Happy thoughts Image credit-pixabay

“चिवचिवाट”
“नुसता चिवचिवाट वाढलाय सगळीकडे, कुणी जरा श्वास घ्यायला जागा सुध्दा देत नाही” या नकारात्मक वाक्यातला “चिवचिवाट” हा शब्द जरा चिमण्यांना छेडणारा वाटतो. जुन्या घराच्या छताच्या आडोश्याचा आधार घेऊन छोट घरटं विणणारे असे हे चिमणा -चिमणी. मानवी डोक्याच्या इन्टेरिओर डेकोरेशननी सजलेल्या २-३ बि.एच. के मध्ये मात्र ,या चिमण्यांची हक्काची जागा नाही. कदाचित पंखाची इच्छाशक्ति नसावी उंच उंच वाढत चाललेल्या घर नावाच्या इमारती कडे झेप घ्यायची, किंवा पुर्वी सारखी घराला घरपण आणणारी माणसं हरविल्यामुळे होतं असावं.आठवतं कां लहान होतो तेव्हा चिमणीचे नवजात पिलु घरट्यातुन बाहेर पडुन असलं कि, अगदी मायेनं पिलाला आय.सि.यु उपचार द्यायचो. तेव्हा जरासं पुण्य केल्याचा आनंद मिळायचा , परंतु हल्ली ते पुण्य कमाविण्याची चळवळ बंद झालीयं, चिमणा चिमणीचा संसार मोडीस आलायं , दाही दिशांनी हे जग गजबजलेलं दिसतं पण चिमणींच्या घरट्यांचा पत्ता हरवलाय, मिळाला तर सांगाल कारण छोट्या लेकरांना घास भरवतांना चिवताई नावाचा घास येताचं ” ये आई ही चिवताई कोण , कुठे राहते ती ? अशी प्रश्न विचारायला सुरवात केली आहे.