Happy women’s day wishes in Marathi 

येत्या ८ मार्च ला जगभरात स्त्री सन्मानार्थ “जागतिक महिला दिन” international womens day 2024 साजरा करण्यात येईल  आज स्त्री एक स्वतंत्र अस्तित्व आहे, ती स्वतः स्वतःला उभी करतेय , घरापासून तर कार्यालयातील जबाबदाऱ्या एकहाती सांभाळतेय, अश्या स्त्री जन्मा तुझ्या कथा , कविता , शब्दात मांडण्या करीत काही womens day quotes in Marathi , happy womens day wishes in Marathi  सादर आहे.

Happy womens day wishes

स्त्री ही जगाची ओळख आहे

स्त्रिया ही जगासाठी उपकार आहे

स्त्री ही प्रत्येक घराची प्राण आहे

मुलगी, आई, वहिनी

स्त्री ही घराची शान आहे

त्याला कमकुवत समजू नका

हा नात्यांचा धागा आहे

स्त्रीला प्रतिष्ठा आणि आदर आहे

स्वप्न अपूर्ण राहतात, इच्छा मनात राहतात

जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी जगते तेव्हा तिचे तुकडे होतात

मी एक स्त्री आहे

निर्मितीचा आधार..

माझ्यामुळे फुलले

ही पृथ्वी…हे संपूर्ण जग…

मी,

स्वतःला तयार करून

प्रत्येक नाते जतन केले

आदर देण्यासाठी मी स्वतःला समर्पित केले…

कधीही असा विचार करू नका की,

तुम्ही बंधनात बांधलेले आहात…

मी शक्ती आहे

माणसाच्या…

प्रकाश किरणं बनून

आयुष्य उजळून टाकते..

स्वतःला अज्ञानी समजण्याची

चूक करू नका…

मी सर्वोत्तम अर्धागिनी आहे

लक्षात ठेवा रस्त्याची धूळ नाही

मी एक स्त्री आहे…

मी एक स्त्री आहे

होय मी एक स्त्री आहे,

मी सुंदर आहे

मी कोमलंगी सुकुमारी

मी छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होते

आणि मी प्रत्येक संकट सहन करू शकते

Mahila din status

कधी कधी मी माझ्या प्रियजनांच्या

आनंदासाठी नतमस्तक देखील होऊ शकते

कधी कधी मी खडकासारखा हट्टी होते

जेव्हाही आग्रह करण्याची तुमची पाळी असते

मी फक्त एका दिवसावर अवलंबून नाही

मी स्वतः जगाचा निर्माती आहे

गरोदरपणातील वेदना मी हसतमुखाने सहन करते

आणि कधी कधी माझ्याच लोकांच्या टोमणे सोसून

मी पण हरते

पण मी स्वतः प्रत्येक जखमेवर मलम लावते

मी आजही सुरू ठेवते

केव्हा केव्हा बांगड्यांचा आवाज होतो

कधी कधी अँकलेट बेड्या बनतात

जेव्हा, माझे अस्तित्व नियमांचे उल्लंघन करू लागते

निर्धाराने मी मैदानात खंबीरपणे उभी आहे.

आणि मी संकोच न करता ते सर्व फेकून देते

आणि मग मी स्वतःला तयार करते

शेल लेयर मधून बाहेर येते

होय, मी एक स्त्री आहे

होय मी कोमलंगी सुकुमारी आहे

पण मला कधीही कमकुवत समजू नका

मी एक नवीन जीवन तयार करू शकते

त्यामुळे मी स्वतःला पुनर्जन्म घेऊ शकते

होय, आता मी स्वतःचा पुनर्जन्म देखील करू शकते

happy womens day wishes quotes

पुरुषाच्या शर्टाच्या तुटलेल्या बटणापासून तुटलेल्या

आत्म्यापर्यंत सर्व काही हाताळण्याचे कौशल्य महिलांमध्ये असते

खूप झालं रडायचं

खूप झालं कुढायचं

लक्षात ठेव तुला आता

थेट आहे भिडायचं

किती काळ..कशासाठी

भीत भीत जगणार आहेस

स्त्री स्त्री म्हणत केवळ

देहाकडे बघणार आहेस

तुझं मन…तुझी बुद्धी..

कर्तृत्वाला मान दे

उंच उंच शिखरावती

आयुष्याला स्थान दे

मान्य आहे मला इथे

श्वापदांची कमी नाही

कोण कुठे काय करील

कशाचीही हमी नाही

त्यांच्यासाठीच तुला आता

शस्त्र घेऊन चालायचंय

वाईट नजर दिसताक्षणी

तिथल्या तिथे सोलायचंय

कायदे कानून न्याय व्यवस्था

सारं काही झूठ आहे

एकच काय ती खरी तुझी

उगारलेली मूठ आहे

ओळख शक्ती दुर्गे तुझी

तरच निभाव लागणार आहे

तेजोवलय दिसल्यावरतीच

जग सरळ वागणार आहे

jagtik mahila din kavita

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी,

त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी

तीच आहे सृजनाची निर्मिती,

तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,

चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !

त्यो विश्वशक्तीचे नाव आहे नारी

ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री

त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई,

भीमरावांची सावली, ती रमाई,

रणांगणांवर लढते जशी राणी लक्ष्मी

त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी

शक्तीपीठ ती नवदुर्गाचे, भक्तीची ऊर्जास्थान,

तिच्यामुळे मिळे आम्हां जगण्याचे आत्मभान,

ती विठूची रुक्मिणी, ती आषाढीची वारी,

नारीमुळे मानवाची आहे जगभर कीर्ती,

त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी

Happy womens day wishes status

तुला कथेत मांडतांना माझीच जरा गफलत होते,

लिहायचं असतं सौदर्या बद्दल

तूझ्या अन् तूझ्या अस्तित्वाच्या प्रश्नानेच सुरुवातीलाच शेवट होते..

मी स्री बद्दल काय लिहायचं असा मुद्दा हजेरी पटावर उभा राहतो

मग सुटलय कां कुणी माझाच मी वर्गातून बाहेर पाहतो,

दिसते तू दुर उभी अगदीच व्याकुळ जरा थकलेली

व्यवहारी जगाशी दोन करतांना घर संसार सुखाचा करतांना

कुठून सुरु करु तूझ्या बद्दल लिहायला राणी झाशी पासून

कि, आई सावित्री पासून.. कि, माझ्याच घरातून..

तू उत्तम गृहिणी असावं माझ्या सारखेच

जवळ जवळ प्रत्येकाचेच असे विचार असतील

कदाचित मग तू जरा चिडशील ,

तूझं चिडणही सहाजिकच..

तू हवेत उडतेय विमानाच्या दोन पखांच्या खटोल्यात..

तू प्रशासकिय खुर्ची सांभाळतेय..

तू मुलांबाळांच करुन नवर्‍याचा डब्बा अन् घराची भिंतीचा आधार होतेय

तू दमलीस कि नाही हा प्रश्न ही मी कथेत तुला विचारणार नाही

कारण पुरुषी अहंकार म्हण कि, कथेची गरज नसेल

कारण मी तूझ्या बद्दल चांगलच लिहिलं

तर प्रत्येकाला रुचेलच असेही नाही

हे बघ ! कसं आहे मी फक्त रकाने च्या रकाने लिहू शकतो

तूझ्या कर्तृत्वाचे पण आम्हा पुरुषांना

तुला प्रगत स्री म्हणून स्विकारायला आणखी वेळ लागेल

तू निवांत रहा, बिनधास्त जग तूझ्या पद्धतीने,

नको करु विचार आमच्या सडक्या कुजलेल्या विचारांचा

कारण आमच्या पुरुषी विचारांचे

कुजून कुजून फक्त खत होऊ शकतं

आणि तूझ प्रत्येक प्रगतीचे पाऊल

हे उद्याच अन्न मुलद्रव्यासारखं

अनमोल माध्यम माणसं जगविण्याचं असू शकतं

तूझ्या गर्भातल्या बाळाची काळजी घ्यायला

आमच्या तील काहीच सरसावतील

बाकी राहीले त्यांचे तुरुंगात त्यांच कंपोस्ट होईल..

तू थांबू नकोस म्हणजे झालं

मी कथा लिहितच राहील

तूझ्या अस्तित्वाच्या नव्या युगातून…